उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२१

मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष चतुर्दशी सायंकाळी १९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- उत्तर भाद्रपदा दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत
योग- व्याघात रात्री २० वाजून ३७ मिनिटापर्यंत
करण १- वणिज सायंकाळी १९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- मीन अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ११ मिनिटांनी
चंद्रोदय- सायंकाळी १७ वाजून ३८ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी

भरती- सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी व रात्री २३ वाजून ४३ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ५ वाजून ०९ मिनिटांनी व सायंकाळी १७ वाजून २९ मिनिटांनी

दिनविशेष:- कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा आणि ईद ए मिलाद

ऐतिहासिक दिनविशेष:

२००० साली लोकप्रिय मराठी गायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९१० साली तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म झाला.

१९२० साली कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म झाला.

१९२५ साली वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म झाला.

१९३६ साली गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म झाला.

You cannot copy content of this page