अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राचा ( CDC ) आरटीपीसीआर चाचणी ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय

https://m.facebook.com/story.php?story_fbid=397569798622780&id=100051092899107

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने ( CDC ) आरटीपीसीआर चाचणी, ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. तसे २१ जुलै २०२१ रोजीचे पत्र ( सोबत जोडले आहे. )

https://drive.google.com/file/d/12K5dS8An3t9RUGvxp9jWl32Qy9DCjh60/view?usp=drivesdk

देशात प्रयोगशाळा व इतर संबंधितांना दिले गेले. अन्न व औषध प्रशासनाने ( FDA ) देखील अशी भूमिका घेतली.

या यंत्रणेने कबुल केले की, आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड आणि फ्लू या विषाणुंमधील भेद ओळखत नाही. याचा अर्थ गेल्या पावणेदोन वर्षांत फ्लू च्या रूग्णांना कोव्हिडचे रुग्ण ठरवले गेले. म्हणूनच लाखो करोडोंच्या संख्येत कोव्हिड बाधितांच्या नोंदी झाल्या. यावर अवलंबुन, हा आजार वेगाने पसरतो असे म्हटले गेले. जागतिक साथ घोषित केली गेली. भयगंड पसरला. पुढे मास्क, लाॅकडाऊन, सार्वत्रिक लसीकरण इ. अनर्थ केला. फ्लू हा तर बहुतेक सर्वांना वरचेवर होणारा सर्वसाधारण आजार आहे. बहुतेक त्यामुळेच या भयनाट्यासाठी फ्लू ची निवड केली आहे.

आरटीपीसीआर च्या शोधाबद्दल डाॅ. कॅरि म्युलिस यांना सन १९९३ चा रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांनी बजावले होते की, हे संशोधन डिएनए वृद्धीसाठी आहे त्याचा वापर विषाणु शोधण्यासाठी करू नये. तसे केल्यास चुकीचे निष्कर्ष येतील. असे दिसते की नेमक्या त्याच हेतूने ही चाचणी जगभर लावली गेली. झोपलेल्याला जागं करता येते परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला ( जागतिक आरोग्य संघटनेला ) जागे करता येत नाही.

युरोप अमेरिकेतील २२ नामवंत शास्त्रज्ञांचा आरटीपीसीआर चाचणी फेटाळून लावणारा अहवाल दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी आला. त्यातही सर्व मुद्दे नमूद आहेत. मग खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी जानेवारी २०२१ मधे काढलेले पत्रक ही एक प्रकारे आरटीपीसीआर चाचणी ही चूक असल्याची कबुली आहे. मात्र आजही ही चाचणी भारतात सर्रास केली जात आहे आणि लाखोंना संकटात लोटले जात आहे.

लाखोंची आरटीपीसीआर टेस्ट केली की खोटे पाॅझिटिव्ह रूग्ण मोठ्या संख्येने मिळतात. मग लाट आल्याचे घोषित होते. माणसे भीतीने, कोव्हिड हाॅस्पिटलमधे एकटे पडल्याने निराशेने, रेमडेसिविर सारखी औषधे, नव्हे विषे दिल्याने आणि खऱ्या आजारावर उपचार झाले नाहीत म्हणून मरण पावली. खरी कारणे न समजल्याने कोरोनाची भीती वाढत गेली. सन १९९० पासून भारतीय समाजात उपभोगवाद बोकाळला. पैसा हे जगण्याचे उद्दिष्ट बनले आणि ज्ञान- विज्ञानाकडे पाठ फिरवली गेली. प्रेम विश्वास उरला नाही. असा समाज सहज बळी पडतो.

बरं, खरंच कोव्हिड म्हणजे कोरोना – २ नोंदला जात आहे वा होता का? तर नाही. ती फसवणुक आजही सर्वत्र चालू आहे. चॅरिटे हाॅस्पिटल बर्लिनने शिफारस केलेली आरटीपीसीआर चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२० मधे स्वीकारली. तिच्या समर्थनाचा अहवाल ‘काॅर्मन – ड्राॅसन अभ्यास’ म्हणून ओळखला जातो. तो अहवालच म्हणतो की, चीनच्या प्रयोगशाळेने पाठवलेल्या ज्या संगणकीय मांडणीवर ही चाचणी आधारित आहे, ती मांडणी कोव्हिड- १९ म्हणजे कोरोना-२ या विषाणूची नाही. ती मांडणी सन २००३ मधे प्रादुर्भाव झालेल्या सार्स ( सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम ) कोरोना विषाणु – १ च्या मांडणीवर आधारित आहे. २२ शास्त्रज्ञांच्या अहवालात, आरटीपीसीआर फेटाळण्याचे हे प्रमुख व पहिले कारण आहे.

येत्या जानेवारीपासून नवी चाचणी पध्दती लावली जाईल असे दिसते. पण आरटीपीसीआर फाॅल्स पाॅझिटिव्ह म्हणजे बाधा नसलेल्यांना बाधा आहे असे नोंदत आली असल्याने जागतिक साथ घोषित झाली होती. ती ९७% चुकीचे निर्णय देत होती हे वास्तव मान्य करून जागतिक साथीची घोषणा व त्याबरोबर सर्व बंधने आणि लसीकरण मागे घेतले पाहिजे.

ही अथ पासून इति पर्यंत फसवणूक आहे. “कोव्हिड- १९ नावाचा विषाणु व अर्थातच त्याची साथ अस्तित्वात नाही”, असे म्हटल्यावर ऐकणाराचा विश्वास बसत नाही, इतके जनतेला भ्रमात टाकले आहे. विज्ञानाच्या नावाने अशी जागतिक पातळीवरील, अक्षरशः जीवघेणी नियोजित फसवणूक इतिहासात झाली नाही.

जनतेने प्रसारमाध्यमांकडे आपले डोके गहाण ठेवले आहे. यापुढच्या टप्प्यात भारतात खोट्या तिसऱ्या लाटेचा प्रयोग करण्यात येईल असे चिन्ह आहे. तसे झाल्यास भारतीयांच्या पुढच्या पिढ्या कायमच्या उध्वस्त होतील. या लसी जनुकीय बदल घडवतात. निर्माण होणारी व्यंगे, आजार, वंध्यत्व इ. दोष पुनरूत्पादनाद्वारे पुढील पिढ्यांमधे विवाहांद्वारे संक्रमित होतील. मग यासंदर्भात लस न घेण्याला अर्थ उरणार नाही.

लेख वाचून गप्प राहू नका. कृपया राजकारणी, नेते, नोकरशहा आणि जनतेला जागं करण्यासाठी झटुन प्रयत्न करा. लस घेतलेल्यांना असे वाटत आहे की, आता स्वातंत्र्य परत मिळेल, परंतु तसे होणार नाही. इझ्रायलमधे जवळजवळ सर्वांनी दोन वा तीन लसी घेतल्या. तरी आता त्यांना दर सहा महिन्यांत एकदा लस घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे. मानवजातीला नियंत्रित गुलाम करण्याचा व लुटण्याचा खास अभिनव मार्ग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत हाताळला जात आहे. त्यापलिकडे या लसींमुळे मानवसंहाराचा कार्यक्रम पार पाडला जात असल्याचा स्पष्ट आरोप डाॅ. मायकेल यिडाॅन, डाॅ. जुडी मायकोविटस, डाॅ. जेन रूबी इ. अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील जागृत डाॅक्टरांच्या आघाडीने श्वेतपत्रिकेत हा अंदाज नमूद केला आहे की, पुढील पाच वर्षांत अमेरिकेतील सुमारे ३०% माणसांचा कोव्हिड लसीकरणामुळे मृत्यू होईल.

हे अवैज्ञानिक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लसीकरण आणि त्याकडे नेणारी आरटीपीसीआर चाचणी तात्काळ थांबवण्याची आणि कोव्हिड प्रकरण गुंडाळण्याची मागणी जगातील नामवंत शास्त्रज्ञ सतत करत आहेत.

भारतीय जनतेचा मोठा घटक संमोहनात आहे किंवा अगतिक बनला आहे. या अवस्थेतून तातडीने बाहेर येणे आवश्यक आहे. निर्णय घेणारांना गदगदा हलवण्याची गरज आहे. राजकारण, मनोरंजन वा इतर कोणतीही गोष्ट यापेक्षा महत्वाची नाही.

“जेव्हा सर्व एकसारखा विचार करतात तेव्हा कुणीही खोल विचार करत नाही.”
-वाॅल्टर लिपमन ( दोनदा पुलित्झर पारितोषिक विजेते )

 

आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक-भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ-  9869023127

(कृपया सदर लेख सर्वांना पाठवा.)