उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१

बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन पौर्णिमा रात्री २० वाजून २५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रेवती दुपारी १४ वाजून ०१ मिनिटांपर्यंत
योग- हर्षण रात्री २० वाजून ३८ मिनिटापर्यंत

करण १- विष्टि सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत
करण २- बव रात्री २० वाजून २५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मीन दुपारी १४ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १० मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजून १२ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी

भरती- दुपारी ११ वाजून ४१ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी व सायंकाळी १७ वाजून ५५ मिनिटांनी

दिनविशेष:- नवान्न पौर्णिमा, अन्वाधान, कार्तिक स्नानारंभ, आकाश दीप दान

आज आहे वाल्मिकी जयंती! अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:

१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे चीन-भारत युद्धास सुरवात झाली.

१९६९ साली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना झाली.

१९७० साली अमेरिकन कृषितज्ज्ञ, हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाला.

१९१६ साली शाहीर अमर शेख यांचा जन्म झाला.

You cannot copy content of this page