उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१

गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा रात्री २२ वाजून १५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- अश्विनी सायंकाळी १६ वाजून १६ मिनिटांपर्यंत
योग- वज्र रात्री २० वाजून ५८ मिनिटापर्यंत

करण १- बालव सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव रात्री २२ वाजून १५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०९ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजून ४६ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ७ वाजून ०२ मिनिटांनी

भरती- रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी व दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी व सायंकाळी १८ वाजून १९ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष:
१९४३ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले. आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.

१९२३ साली जीवन विद्या मिशनचे संस्थापक, सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्म झाला.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे ,
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव ,
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर ,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ||
या श्लोकातून त्यांनी जीवनविद्या मिशनची मांडणी केली.

You cannot copy content of this page