पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी रात्री २२ वाजून २६ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत
योग- साध्य २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ४३ मिनिटापर्यंत
करण १- वणिज सकाळी ०९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि रात्री २२ वाजून २६ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- मिथुन अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- रात्री २० वाजून १५ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०९ वाजून १४ मिनिटांनी होईल
भरती- रात्री ०१ वाजून २९ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ०३ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ०४ मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ०८ वाजून १४ मिनिटांपासून सकाळी ०९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत
दिनविशेष:-
एक श्रेष्ठ मराठी नाटककार, संपादक, राजकीय प्रश्नांचे चिकित्सक, अध्यात्मवादी. दैनिक ‘केसरी’चे संपादक, दैनिक ‘नवाकाळ’चे संस्थापक, मराठी लेखक, ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर यांचा जन्म १८७२ साली झाला.
१९२६ साली अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांचा जन्म झाला.
१९३७ साली नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन झाले.
२००० साली चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन.