पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१

सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष तृतीया रात्री २२ वाजून २६ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत
योग- साध्य २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून ४३ मिनिटापर्यंत

करण १- वणिज सकाळी ०९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि रात्री २२ वाजून २६ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- रात्री २० वाजून १५ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०९ वाजून १४ मिनिटांनी होईल

भरती- रात्री ०१ वाजून २९ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ०३ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ०४ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ०८ वाजून १४ मिनिटांपासून सकाळी ०९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

————

दिनविशेष:-

२२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना.
१९६३ साली अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या झाली.

२०१३ साली भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

२००० साली अग्रगण्य अणूरसायनशास्त्रज्ञ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, प्रभावी वक्ते डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन झाले.