पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१

सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष अष्टमी सायंकाळी १९ वाजून २८ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- हस्त २८ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजून ०६ मिनिटांपर्यंत
योग- सौभाग्य सकाळी ०८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन २८ डिसेंबरच्या सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत

करण १- बालव सकाळी ०७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल २८ डिसेंबरच्या सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत

करण २- कौलव सायंकाळी १९ वाजून २८ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कन्या अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून १२ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०७ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री ०० वाजून २२ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी

भरती- पहाटे ०५ वाजून ०० मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ५१ मिनिटांनी
ओहोटी- दुपारी ११ वाजून ४९ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ३५ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ०९ वाजून ३२ मिनिटांपासून सकाळी ०९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
———
दिनविशेष:-

विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांचा आज जन्मदिन.

१९११ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

१९४५ साली २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची स्थापना करण्यात आली.