उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष अष्टमी दुपारी १४ वाजून ८ मिनिटापर्यंत
नक्षत्र- पुष्य दुपारी ११ वाजून ३७ मिनिटापर्यंत
योग- शुभ ३० ऑक्टोबरच्या रात्री ०१ वाजून ५७ मिनिटापर्यंत

करण १- कौलव दुपारी १४ वाजून ०८ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल ३० ऑक्टोबरच्या रात्री ०२ वाजून ३२ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कर्क अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४० मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०५ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १३ वाजून ४४ मिनिटांनी

भरती- पहाटे ०५ वाजून ३१ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून १२ मिनिटांनी
ओहोटी- दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ४२ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे जागतिक पक्षाघात दिन. पक्षाघात ह्या आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे असून उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार असलेल्यांना पक्षाघाताचा धोका अधिक असतो. हल्लीच्या काळात बदललेली जीवनशैली ह्या आजाराला आमंत्रण देत आहे.

ऐतिहासिक दिनविशेष

१९४५ साली जगात पहिले पहिले बॉल पॉईंट पेन बाजारात आले.

१९५८ साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार देण्यात आला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले.

१९७८ साली भारतात वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन झाले. ते विकृतिशास्त्रज्ञ आणि जीवाणूशास्त्रज्ञ होते. देशाच्या निरनिराळ्या प्रांतातील लोकांच्या आहाराच्या व इतर संवयी तसेच तेथील कर्करोगाचे प्रमाण यांचा संबंध तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

१९९६ साली स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. तर

२०१५ साली चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.