उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१

शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष नवमी दुपारी १४ वाजून ४२ मिनिटापर्यंत
नक्षत्र- आश्लेषा दुपारी १२ वाजून ५० मिनिटापर्यंत
योग- शुक्ल ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत

करण १- गरज दुपारी १४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज ३१ ऑक्टोबरच्या रात्री ०२ वाजून ४१ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कर्क दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४० मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०४ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री १ वाजून २ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १४ वाजून २७ मिनिटांनी

भरती- सकाळी ०६ वाजून ५६ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून १५ मिनिटांनी
ओहोटी- दुपारी १३ वाजून ५७ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे आंतरराष्ट्रीय ऑर्थोपिडिक परिचारिका दिन

ऐतिहासिक दिनविशेष

१९६० साली मायकेल वूडरफने एडिनबर्गमधील एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी येथे सर्वप्रथम मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण केले

१८८१ साली आचार्य नरेंद्र देव यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते प्रमुख नेते, पत्रकार आणि साहित्यिक होते.

१९४५ साली भारताला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व मिळाले.

१९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे संपन्न झाला.

१९२८ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे आणि
१९९६ साली मराठी कादंबरीकार, कामगार नेते प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page