उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार ४ सप्टेंबर २०२१

शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- १३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष द्वादशी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पुष्य सायंकाळी १७ वाजून ४४ मिनिटांपर्यंत
योग- वरियान सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल सकाळी ०८ वाजून २४ मिनिटांपर्यंत
करण २- गरज रात्री २० वाजून २७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कर्क अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ४९ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून १५ मिनिटांनी होईल.

ओहोटी- पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ५० मिनिटांनी
भरती- सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी आणि सायंकाळी २२ वाजून २५ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे शनी प्रदोष आणि अश्वत्थमारुती पूजन!

ऐतिहासिक दिनविशेष

१८८२ साली थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

१९३७ साली प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.

१९७२ साली मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

१९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

२०१३ साली रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

१२२१ साली महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी आणि

१८२५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म झाला.