पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष एकादशी १ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून १३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- हस्त रात्री २१ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
योग- आयुष्यमान १ डिसेंबरच्या रात्री ० वाजून १ मिनिटांपर्यंत
करण १- बव सायंकाळी १५ वाजून १९ मिनिटांपर्यंत
करण २- बालव १ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून १३ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- कन्या अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५७ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- उत्तररात्री ०२ वाजून ३१ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १४ वाजून ५८ मिनिटांनी
भरती- सकाळी ०७ वाजून ५९ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ०९ मिनिटांनी
ओहोटी- उत्तररात्री ०१ वाजून ४९ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ३८ मिनिटांनी
राहुकाळ- सायंकाळी १५ वाजून १३ मिनिटांपासून ते सायंकाळी १६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे.
दिनविशेष:- आज आहे उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रा
३० नोव्हेंबरच्या महत्वाच्या घटना….
१९३७ साली नोबेल पारितोषिक विजेते भारतीय महान शास्त्रज्ञ, जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला.
भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरा तत्त्वज्ञ, जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे.
१९३५ साली मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म झाला. यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरी कार होते.
सामाजिक कार्यकर्ते, भारतीय समाज सुधारक राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली, आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले.
२०१२ साली भारताचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन झाले.