पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ०४ डिसेंबर २०२१
शनिवार दिनांक ०४ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक अमावास्या दुपारी १३ वाजून १३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- अनुराधा सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत
योग- सुकर्मा सकाळी ०८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृती ५ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजून २० मिनिटांपर्यंत
करण १- नाग दुपारी १३ वाजून १३ मिनिटांपर्यंत
करण २- किंस्तुघ्न रात्री २३वाजून २० मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- वृश्चिक अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५९ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल
चंद्रोदय- सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १८ वाजून ०८ मिनिटांनी
भरती- सकाळी ११ वाजून १८ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०५ वाजून ३४ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ३३ मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटांपासून ते सकाळी ११ वाजून ०६ मिनिटांपर्यंत
दिनविशेष:-
आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन
जगभरातील विविध कामात गुंतलेल्या स्वयं सेवकांचे आणि स्वयं सेवी संस्थांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याच्या हेतूने दरवर्षी 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक मृदा अर्थात माती दिन
दरवर्षी 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा अर्थात माती दिन म्हणून साजरा केला जातो; जेणेकरून निरोगी मातीचे महत्त्व तसेच मातीच्या संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाचे महत्त्व यावर लोकांचे लक्ष केंद्रित केले जाईल.
5 डिसेंबर 2013 साली वयाच्या 95 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेष विरोशी नेते, स्वातंत्र्यसेनानी नोबेल आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त नेल्सन मंडेला यांचे निधन झाले.
२०१६ साली तामिळनाडूच्या मुख्यमंत्री तसेच अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा “जयललिता” यांचे त्यांच्या ६८ व्या वर्षी चेन्नई येथे अपोलो रुग्णालयात प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
१९४६ साली प्रवचनकार दादामहाराज सातारकर १९५० साली योगी अरविद घोष स्वर्गवासी झाले.