उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१

बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष षष्टी सकाळी १० वाजून ४९ मिनिटापर्यंत
नक्षत्र- आर्द्रा सकाळी ०७ वाजून ०७ मिनिटापर्यंत
योग- सिद्ध २८ ऑक्टोबरच्या रात्री ०२ वाजून ०७ मिनिटापर्यंत

करण १- वणिज सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि रात्री २३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथून २८ ऑक्टोबरच्या रात्री ०३ वाजून ०४ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३९ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २३ वाजून १२ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी

भरती- पहाटे ०३ वाजून ३४ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ५९ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ०७ मिनिटांनी

दिनविशेष
आज आहे जागतिक ऑडिओ व्हिज्युअल वारसा दिन!

ऐतिहासिक दिनविशेष

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।। उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।। कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।।

अशा जगास्तव काय कुढावें । मोहिं कुणाच्या कां गुंतावें।। हरिदूता कां विन्मुख व्हावें । कां जिरवुं नये शांतींत काय।।

ह्या प्रसिद्ध कवितेचे कवी भा रा. तांबे यांचा जन्म १८७४ साली झाला.

ते आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक, अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी, ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले कवी होते. राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांच्या कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाल्या.

१९२० साली भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन
१९२३ साली उद्योगपती अरविंद मफतलाल
१९४७ साली समाजसेवक डॉ. विकास आमटे आणि
१९५४ साली पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म झाला.