उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२१

गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन अमावस्या ५ नोव्हेंबरच्या उत्तररात्री २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- चित्रा सकाळी ०७ वाजून ४२ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाती रात्री २१ वाजून ६ मिनिटांपर्यंत
योग- प्रीति सकाळी ११ वाजून ०९ मिनिटापर्यंत

करण १- चतुष्पाद सकाळी १६ वाजून २६ मिनिटांपर्यंत
करण २- नाग ५ नोव्हेंबरच्या उत्तर रात्री २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- तूळ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांनी

चंद्रोदय- पहाटे ५ वाजून ४९ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १७ वाजून ५० मिनिटांनी

भरती- सकाळी ११ वाजून ०४ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ५१ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०५ वाजून ०५ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून १६ मिनिटांनी

आध्यात्मिक दिनविशेष:- आज आहे नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान लक्ष्मी पूजन!

ऐतिहासिक दिनविशेष:-
१८४५ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म झाला.

१८८४ साली प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म झाला.

१८९४ साली कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म झाला. हे महात्मा गांधींचे अनुयायी होते.

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.