कबड्डीच्या जगन्नाथाला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगन्नाथ अर्थात जगाचा स्वामी!

कब्बड्डी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नव्हेतर कबड्डी खेळ हेच जीवन बनविणारे सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले खऱ्या अर्थाने कबड्डीचे जगन्नाथ आहेत. उभं आयुष्य कब्बड्डी खेळावर प्रेम करून अनेकांना त्या खेळाचा कसा आनंद लुटायचा? हे त्यांनी सहजरित्या दाखवून दिले. एका बाजूला कबड्डीचा खेळ तर दुसऱ्या बाजूला सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले. अशा आमच्या प्राणप्रिय मित्राला ऐंशीव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले यांच्याकडे दीर्घ अनुभवाची आणि कार्याची शिदोरी आहे. शिवनेरी सेवा मंडळाचे ते माजी उपाध्यक्ष. शिवनेरी सेवा मंडळासाठी ते जेष्ठ मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडतात. आजही मंडळासाठी तेवढ्याच धडाडीने कार्य करतात. त्यांनी `मुंबई पोर्ट ट्रस्ट’मध्ये नोकरी केली. त्याकाळात त्यांनी `मुंबई पोर्ट ट्रस्ट’चा कबड्डीचा संघ तयार केला आणि कबड्डीच्या खेळाडूंना `मुंबई पोर्ट ट्रस्ट’मध्ये नोकरी मिळवून दिली.

सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले यांनी जे कार्य केले आहे, ते अतुलनीय आहे त्याच्या कार्याला आमचा सलाम आणि त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मनःपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा! त्यांना त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, यश, कीर्ती आणि सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना!

– मोहन सावंत