सिंधुदुर्ग जिल्हयात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय नोंद करा!
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- सिंधुदुर्ग जिल्हयातील युवक युवती, इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज असोसिएशनला आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय लिंक वर नोंद करण्यात यावी; जेणेकरून या अभ्यासक्रमाचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात येईल; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील युवक युवतींना उद्योगाच्या मागणीवर आधारित (Demand Driver) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि. 1 ते 31 जुलै 2023 दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिम आणि उद्योगाची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/kYtsxbvhrz२s७z६q८ अशी आहे. याव्दारे जिल्हयातील युवक युवतींना या लिंकवर आवश्यक असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय नोंद लिंकवर करण्यात यावी.
उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी (Mapping of Skill Requirement in Manpower of Industries) मोहीम दि. 1 ते 31 जुलै 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यांत आला असून गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/३ LQGQTayTnk२gZWk९ अशी आहे. जिल्हयातील उद्योजकांना आवश्यक कुशल, अर्धकुशल व अकुशल उमेदवारांना आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाची गरज सेक्टर निहाय नोंदविल्यास त्या अभ्यासक्रमाचा समोवश कौशल्य प्रशिक्षणात करणे शक्य होईल.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. MSSDS मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत जिल्हा कौशल्य विकास आराखडयाच्या माध्यमातून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.
मराठा, कुणबी उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणसाठी लिंकव्दारे नोंदणी करावी!
जिल्ह्ययातील मराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी- मराठा उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम लिंकव्दारे भरुन नोंदणी करावी, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. ग.प्र. बिटाडे यांनी केले आहे.
सारथीच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला असून त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://Kaushaly.mahaswayam.gov.in/users/sarthi .
या कार्यक्रमांतर्गत सारथीच्या लक्षित गटातील (मराठा,कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी- मराठा) उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्ह्यातील स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत उद्दीष्ट वाटप करण्यांत येणार आहे.
छत्रपती शाहु महाराज संशोधन प्राशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील 20,000 उमेदवारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02362,228835 किंवा ई-मेल sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.