किशोर तावडे यांनी स्विकारला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!
सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री. तावडे हे यापूर्वी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यांचा सेवा कालावधी:-
1.जून 1995 ते जूल 1997- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी येथे रूजू
2. जून 1997 ते डिसेंबर 1997- जिल्हा पुरवठा अधिकारी , रत्नागिरी
3. डिसेंबर 1997 ते जून 1998- जिल्हा पुनर्वसन अधिकारी , जव्हार, ठाणे
4. जून 1998 ते ऑगस्ट 2000- उपविभागीय अधिकारी, चिपळूण
5. ऑगस्ट 2000 ते जुलै 2002 – निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी
6. जुलै 2002 ते जूल 2006- प्रादेशिक अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर
7. जून 2006 ते जानेवारी 2009- सहायक आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण भवन , नवी मुंबई
8. जानेवारी 2009 ते जुलै 2011 – निवासी उपजिल्हाधिकारी , सांगली
9. जुलै 2011 ते 5 सप्टेंबर 2014- अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
10. 6 सप्टेंबर 2014 ते 8 जुलै 2016- अपर जिल्हाधिकारी , पालघर, मुख्यालय
जव्हार
11. 10 जुलै 2016 ते 11 नोव्हेंबर 2020 – विशेष कार्य अधिकारी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई
12. 12 नोव्हेंबर 2020 ते 22 ऑगस्ट 2023 – व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई