चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिलाच देश!

बंगळुरु:- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अभूतपूर्व यश संपादन केले असून चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केले. ही कार्य करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे. चांद्रयान- ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशाला संबोधित करून शुभेच्छा दिल्या व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर लँडिंग केले असून भारत चौथा देश ठरला.

चांद्रयान – ३ नेमके काय?

प्रक्षेपणापासून ४० दिवस चाललेली मोहीम चांद्रयान – २ ह्या अंशतः अयशस्वी झालेल्या मोहिमेसारखीच आहे. चांद्रयान – २ अयशस्वी झाल्यामुळे इस्रोने चांद्रयान – ३ ची घोषणा करून १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. ह्या यानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दक्षिण गोलार्धात उतरणे. आजपर्यंत जगात कोणत्याही राष्ट्राने दक्षिण गोलार्धात यान उतरवले नसून भारत मात्र ह्याचा पहिला मानकरी ठरला. यासोबतच तो चंद्रावर यान उतरवणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवले.

या चंद्र मोहिमेचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग. दुसऱ्या टप्प्यात प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या भूमीवर उतरवणं आणि तिसरा टप्पा म्हणजे माहिती गोळा करून ती पृथ्वीच्या दिशेने पाठवणं. ह्या यानातील रोव्हर व्यवस्थित उतरण्याकरीत सादर लँडरची एक बाजू विशिष्ट पद्धती मध्ये उघडून चंद्रावर उतरवण्यात येईल. नंतर सहाचाकी असलेला रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागवर फिरण्यास मुक्त होईल. ह्या सर्व प्रक्रियेकरिता लँडर चार तासाचा अवधी लागेल. त्याची फिरण्याची गती साधारण एका सेकेंदाला एक सेंटीमीटर असेल. चंद्रावर फिरत असतानाच छायाचित्रासोबत इतर माहिती लँडरच्या साहाय्याने पृथ्वीवर पाठवण्यात येईल. विशेष म्हणजे रोव्हरच्या वर देशाचा तिरंगा असून रोव्हरची दोन चाकं चंद्राच्या पृष्टभागावर एक पॅटर्न बनवतील (ठसा उमटवतील). इस्रोचा लोगो आणि भारताच्या राष्ट्रीच चिन्हाचा ठसा उमटवला जाईल.

ह्या मोहिमेत मुख्य काम चांद्रयान- ३ मार्फत पोहोचलेल्या रोव्हरचे असून त्याने अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावणे अपेक्षित असून, त्यासह चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, चंद्राच्या मातीत पाण्याच्या बर्फाची उपस्थिती, चंद्राच्या प्रभावांचा इतिहास, चंद्राच्या वातावरणाची उत्क्रांती इत्यांदीची माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page