सिंपन प्रतिष्ठानचा १४ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली:- सिंपन प्रतिष्ठानतर्फे गुरुवार १४ मे रोजी सकाळी १० वाजता येथील मराठा मंडळ हॉलमध्ये परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाला माजी समाज कल्याणमंत्री भाई गिरकर, कणकवली कॉलेजचे प्रा. सोमनाथ कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्याला जानवली सरपंच अजित पवार, चित्रकार नामानंद मोडक, वास्तुविशारद प्रथमेश पडवळ, सामाजिक कार्यकर्ते वाय. डी. सावंत, अशोक कदम, संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी सिंपन प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा स्मृतिशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा सिंपन जीवन गौरव पुरस्कार एस. एस. मुंबरकर यांना तर स्मृतिशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सिंपन विजयी भव युवा पुरस्कार ख्यातनाम चित्रकार रोहन पवार यांना दिला जाणार आहे. तसेच सिंपन अमृत सन्मान पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौकेकर व सिंपन विशेष सन्मान सरिता कदम, वेदांत तांबे यांना दिला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!