प्रभावी आणि अष्टपैलू नटसम्राट नाना पाटेकर स्वर्गवासी!
पणजी:- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
डॉ. साळकर यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे २.३० वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचे कळवले होते. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने मित्राने तो मेसेज तत्काळ पाहिला नाही. मेसेज लक्षात आल्यानंतर मित्राने नानांशी संपर्क साधला आणि पहाटे सुमारे ४ वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. मित्र घरी पोहोचला तेव्हा नाना पाटेकर फरशीवर पडलेले होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच मित्राने केअरटेकरला बोलावून रुग्णवाहिका मागवली. डॉक्टरांच्या माहितीनुसार रुग्णवाहिका आल्यानंतर नाना पाटेकर यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यास सुरुवात करण्यात आली. ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याने आपत्कालीन वैद्यकीय पथकाने घटनास्थळीच सीपीआर (CPR) सुरू केला. त्यानंतर त्यांना पहाटे सुमारे ४.२० ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास हृदयाची मालिश व पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि पहाटे सुमारे ५.२० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वैद्यकीय कारण अधिकृत प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.
अभिनय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले!
रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. अंकुश, परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, खामोशी, अब तक छप्पन, राजनीती, वेलकम तसेच नटसम्राट यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांना पद्मश्रीसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे.










