मालवण एसटी आगार दुरुस्ती आणि बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवा!
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने निवेदन
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी मालवण एसटी आगार इमारत मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करणे व मालवण बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवणेबाबत निवेदन एसटीचे अधिकारी विनोद शंकरदास यांना जिल्हा सचिव श्री. किशोर नाचणोलकर यांचे उपस्थितीत मालवण तालुकाध्यक्ष श्री. सुधीर धुरी, मालवण तालुका सचिव श्री. महेश मयेकर, मालवण तालुका निरीक्षक श्री. संदेश फाटक, मालवण तालुका जनसंपर्क अधिकारी श्री. प्रमोद कांडरकर यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी एसटी संदर्भात इतर समस्या बाबतही चर्चा करणेत आली.