उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१

शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ०२
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष तृतीया सकाळी ०८ वाजून २९ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- अश्विनी सकाळी ०८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
योग- व्याघात दुपारी १४ वाजून ०७ मिनिटांपर्यंत
करण १- विष्टि सकाळी ०८ वाजून २९ मिनिटांपर्यंत
करण २- बव सायंकाळी २१ वाजून २९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ३१ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २० वाजून ४८ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सकाळी ०९ वाजून ०९ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ४७ मिनिटांनी तर
भरती- रात्री १ वाजून ४० मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ३९ मिनिटांनी असेल.

दिनविशेष:-  संकष्ट चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध आणि भरणी श्राद्ध

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक होते.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला. ह्या मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला होता.
२०१५: साली मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार झाले होते.

जन्म:-
१८६१: साली भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म झाला.

You cannot copy content of this page