पा. `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखाची मुख्यमंत्रांकडून दखल!

मुंबई:- २९ जुलै २०२३ रोजी `मायबाप ‘आपले सरकार’ पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!’ ह्या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीय लेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली होती की, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे सरकारी दाखले मिळविण्यासाठी पालकांना आर्थिक व मानसिक त्रास होतोय; तो त्वरित थांबविण्यात यावा! त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून तसा ईमेल पाक्षिक `स्टार वृत्त’ला १ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने पाठविला आहे. कर्तव्यतत्पर, प्रामाणिक, कार्यक्षम व अनुभवी असणारे महसूल विभागाचे सचिव आयएएस अधिकारी डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी संपादकीय लेख पाठविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महसूल विभागातून मिळणारे वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र अत्यावश्यक असतात. ते मिळविताना पालकांना जो त्रास होतोय त्यावर पाक्षिक `स्टार वृत्त’ने संपादकीय लेख https://starvrutta.com/editorial-may-bap-government-stop-the-trouble-of-parents-students/ लिहून पालकांचे मनोगत व्यक्त केले होते.

हा लेख प्रसिद्ध होताच अनेक पालकांनी पाक्षिक `स्टार वृत्त’ने व्यक्त केलेले मनोगत योग्य असून त्याची दखल शासनाने त्वरित घ्यावी; अशी मागणी केली. सदर लेखच ईमेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आला होता. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून तसा ईमेल पाक्षिक `स्टार वृत्त’ला १ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने पाठविला. कर्तव्यतत्पर, प्रामाणिक, कार्यक्षम व अनुभवी असणारे महसूल विभागाचे सचिव आयएएस अधिकारी डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी संपादकीय लेख पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पालकांचा त्रास थांबेल असा आशावाद पालकांनी व्यक्त केला आहे.