सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 334 पदांसाठी भरती

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाकडील गट क मधील रिक्त पदे भरण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील 17 संवर्गाच्या 334 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची, माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

जाहिरातीचा संपूर्ण तपशिल जिल्हा परिषदेच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पध्दतीनेच https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर अर्ज दि. 5 ऑगस्ट 2023 पासून ते दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी 23.59 वाजेपर्यत सादर करता येणार आहेत.

भरती परीक्षा IBPS या कंपीनव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अर्ज दाखल करण्यात काही अडचणी आल्यास जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दूरध्वनी क्र. 02362 228817 वर संपर्क साधावा. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी केले आहे.