राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली:- मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालायने दिलेला निर्णयाला व शिक्षेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला. त्यामुळे त्यांना त्यांची खासदारकी परत मिळून संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला.

मोदी आडनावाची बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालायने दोन वर्षाची शिक्षा सुनावलं होत. त्यामुळे लोकसभा सचिवालयतर्फे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. ह्याप्रकरणी राहुल गांधी यांनी ह्या निर्णयाविरीधात सर्वोच्च नायालयात धाव घेतली होती. तेव्हा आज त्याचा निकाल लागला.

निकाल जाहीर करताना नायालयाने गांधी यांना समज देत, तुम्ही केलेले विधान योग्य नसून सार्वजनिक आयुष्यात भान ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच गुजरात उच्च नायालयाने शिक्षा देताना पुरेपूर विचार न करताच दिली, असे सर्वोच्च नायालयाने म्हंटले आहे. त्यासोबतच जर दोन वर्षाची शिक्षा १ दिवस सुद्धा कमी असली असती तर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली नसती. त्यामुळे हा उच्च नायालयाचा निर्णय हेतुपुरस्सर असून खासदारकी रद्द करण्याकरिता झाला होता का? असा सवाल सर्वोच्च नायालयाने उपस्थित केला आहे.