यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2011-12 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास योजनेच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनाचा लाभार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा; असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
वैयक्तिक घरकुल योजनाची आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
लाभार्थ्यांचे पूर्ण नाव. संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक. अर्जदाराची जन्मतारीख व वय, सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जात प्रमाणपत्र (विजाभज, अ,ब व ड), जागेचा तपशिल गट नं. क्षेत्र इ. घराचा प्रकार-झोपडी, कच्चे घर, पाल, बेघर. कुटुंबाच्या मालकीचे कच्चे घर असणे आवश्यक आहे. घराचा 8 अ चा उतारा व ग्रामसेवक यांचेकडील कच्चे घर बेघर असल्याबाबतचा दाखला. वार्षिक उत्पन्नाचा दाखला (मर्यादा रु.1 लाख 20 हजार रुपये). कुटुंबातील व्यक्तिंची एकुण संख्या, सोबत रेशनकार्ड. आधार कार्ड, सक्षम अधिकारी यांचेकडील अधिवास व रहिवासी प्रमाणपत्र. लाभार्थी कुटुंब हे द्रारिद्ररेषेखालील असल्यास दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र. लाभार्थी विधवा, परितक्त्या,अपंग असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. लाभार्थी पूरग्रस्त असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र. राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील सोबत बँक पासबुकची छायांकित प्रत. खाते क्रमांक, बँकेचे नाव व शाखेचा उलेख करावा. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.