वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2003-04 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गतील दलित वस्ती सुधार योजनाच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारथी अशा भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनाचा लाभार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :- ग्रामपंचायतीतील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग लोकसंख्येबाबतचा दाखला. कामाबाबतचे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या व्यक्तींचे मागणीपत्र. कामाचा उपयोग वि.जा.भ.ज व वि.मा.प्र. प्रवर्गाच्य व्यक्तींना होणार असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला. ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे कामाबाबतचे मागणीपत्र. कामाची जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा उतारा. शासनाने मंजुर केलेल्या अनुदानापेक्षा जादाचा होणार खर्च ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून करण्यास तयार आहे. असा स्पष्ट उल्लेख असलेल्या ग्रामपंचायतीचा मासिक ठरावयाची प्रत. काम मागील वर्षात अन्य कोणत्याही योजनेतून प्रस्तावित केलेले नाही किंवा सुरु नाही याबाबतचा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी याचा दाखला. काम सुरु करणेपूर्वीचा सद्यस्थितीचे छायाचित्र. गामपंचायतीच्या खाती असलेल्या शिल्लक रकमेचा तपशिल बँक बॅलन्स सह (कॅशबुकचा उतारा) सादर करावा.प्रस्ताव ज्या महिन्यात सादर करणार आहेत त्या महिन्यचा किंवा त्या आधीच्या महिन्याचा, काम ज्या जागेत घ्यावयाचे आहे त्या ठिकाणाचे नाव व काम घेणेबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव. सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीतील लोकसंख्येचा दाखला. कामाचे मा.उपअभियंता,बांधकाम विभाग जि.प.यांचे सहीचे अंदाजपत्रक व कामाचा आराखडा. इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत.