सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!

जुना मीटर काढायला देऊ नका; स्मार्ट मीटर लावायला देऊ नका!

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच स्मार्ट मीटरचा राक्षस (जो भांडवलदार व राज्यकर्ते यांनी तयार केलाय…) प्रत्येक सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी जनतेला खाणार आहे!

स्मार्ट मीटर ही देशाला व जनतेला लुबाडणारी योजना असून त्याबाबत अनेक तज्ञ अनुभवी मंडळी, संघटना विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत. आम्हा वीज ग्राहकांचे आता एकच काम आहे; ते म्हणजे स्मार्ट मीटर लावू द्यायचा नाही. जुन्या विद्युत मीटर ऐवजी स्मार्ट मीटर लागला की आपल्या हातात काहीच उरणार नाही. तो स्मार्ट मीटरचा राक्षस आपणास आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खाऊन टाकणार! का आणि कसे? हे अनेक तज्ञांकडून आपण समजून घेणार आहोत!

ज्यांनी ज्यांनी स्मार्ट मीटर लावले ते ग्राहक आज जुन्या मीटरची मागणी करताहेत. ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी ६ विद्युत कामगार युनियन, इतर २४ कामगार युनियन, ८ शेतकरी संघटना, ८ अन्य संघटना, तसेच महाराष्ट्र ग्राहक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एवढेच नाही तर मुंबई उच्च न्यायालयात स्मार्ट मीटर विरोधात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्येही स्मार्ट मीटरबाबत असंतोष वाढत आहे.

त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या जागेतील जुना मीटर काढू द्यायचा नाही; नवीन स्मार्ट मीटर लावू द्यायचा नाही! ही चळवळ प्रत्येकालाच नव्हे तर देशाला वाचविणारी असेल व त्याला आपण सर्वांनी साथ दिलीच पाहिजे; असे आवाहन स्मार्ट मीटर विरोधी कार्य करणाऱ्या विविध संघटनांनी तज्ञांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

 

हेही वाचा…!

आर्थिक दिवाळखोरीत नेणारी स्मार्ट वीज मीटरची सक्ती रद्द करण्याची मागणी!

हेही वाचा…!

स्मार्ट मीटरला विरोध करा!

हेही वाचा…!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

“मजदूर-विरोधी, जन-विरोधी स्मार्ट बिजली मीटरों का एकजुट होकर विरोध करें!” पुस्तिका का अनावरण