नगर वाचनालय कणकवलीच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांची फेरनिवड

महम्मद हनीफ पीरखान यांची कार्यवाहपदी निवड

कणकवली:- नगर वाचनालय कणकवली या संस्थेच्या कार्यकारणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारीणी मंडळाची निवड करण्यासाठी नुकतेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आमदार नितेश राणे यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली. तर महम्मद हनीफ आदम पीरखान यांची कार्यवाह पदी आणि सहकार्यवाह म्हणून डी.पी.तानवडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सदस्यांचे आभार मानले व येत्या तीन वर्षासाठीच्या कामाची थोडक्यात रुपरेषा आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केली. त्यावेळी त्यांनी कार्यकारणीतील नवीन सदस्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यकारणीत पुढील सदस्यांची निवड झाली.
श्री.समीर नलावडे (पदसिध्द उपाध्यक्ष), सौ.कल्पना प्रभाकर सावंत, सौ.मेघा अजय गांगण, श्री.महेश पांडुरंग काणेकर, श्री. अभिजीत भास्कर मुसळे, श्री.रविंद्रनाथ वसंत मुसळे, श्री.पिराजी जिवबा कांबळे, श्री.वैजयंती विद्याधर करंदीकर, डाॅ. विद्याधर वसंत तायशेटे (विशेष सल्लागार).

You cannot copy content of this page