कॉस्मोपॉलिटनच्या सदस्यांची आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांची भेट घेऊन चर्चा!

मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशन, पाटलीपुत्र नगर येथील रहिवाशी व पदाधिकाऱ्यांनी वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन विकासकामांबाबत चर्चा केली.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनी सोसायटीतील आमदार फंडातून सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डनचे उद्घाटन आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या शुभहस्ते व्हावे; अशी विनंती कॉस्मोपॉलिटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशन, पाटलीपुत्र नगर येथील रहिवाशी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यावेळी नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर, नगरसेविका श्रीमती रंजना पाटील, पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशन सेक्रेटरी श्री. मोहन सावंत, श्री.सोनाळकर, निजाम चौधरी, करीमभाई, राजेश गुप्ता, श्रीमती नेहा गुप्ता, श्रीमती मुग्धा सावंत, श्रीमती झेबा खान, सबेरा शेख उपस्थित होते.