पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विलीन!
पुणे:- महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, इतिहास संशोधक, ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक, शिवभक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता.
“आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.
बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली.
७० वर्षे त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता.
इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले.
त्याशिवाय ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
बाबासाहेब पुरंदरे हे विनोदबुद्धी, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार होते. अनेकदा त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला. त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला होता. https://t.co/EC01NswpUC
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने अत्यंत दुःखी झालो आहे. प्रसिध्द लेखक, इतिहासकार आणि रंगकर्मी पुरंदरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या महान कार्यासाठी सदैव स्मरणात राहतील.त्यांचे कुटुंबीय आणि स्नेही परिवार यांच्याप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत आहे.ओम शांती. pic.twitter.com/wPvFOuineK
— Vice President of India (@VPSecretariat) November 15, 2021
कुछ वर्ष पूर्व बाबासाहेब पुरंदरे जी से भेंट कर एक लम्बी चर्चा करने का सौभाग्य प्राप्त हुआ था। उनकी ऊर्जा और विचार सचमुच प्रेरणीय थे। उनका निधन एक युग का अंत है। उनके परिजनों व असंख्य प्रशंसकों के प्रति संवदेनाएँ व्यक्त करता हूँ। प्रभु उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें। ॐ शांति pic.twitter.com/42vteArFwl
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2021
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. pic.twitter.com/5oKh3CDykQ
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 15, 2021
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. pic.twitter.com/hRpE2vD08P
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 15, 2021
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! #शिवशाहीर #श्रद्धांजली pic.twitter.com/x7xRdQzalr
— Raj Thackeray (@RajThackeray) November 15, 2021
महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने त्यांनी दिली. या विषयासंबंधी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत. pic.twitter.com/LouQxgTHu9
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021
शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकुन मला अत्यंत धक्का बसला आहे.शिवछत्रपतींचे अलौकिक कार्य शिवचरित्रा द्वारे बाबा साहेबांनी घरोघरी पोहोचवले. त्यांचे सर्व जीवनच छत्रपती होते.छत्रपतीं मुळेच महाराष्ट्र झाला याची जाणीव त्यांनी आजच्या पीढ़ीला करुन दिली. pic.twitter.com/HcHK6iMB9y
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) November 15, 2021