कराड येथे महापुरात अडकून पडलेल्या ५०० ट्रक चालकांची जेवणाची सोय!
कराड:- कराड जवळ कृष्णेच्या महापुरामुळे नॅशनल हायवे ४ वर जवळपास ५०० ट्रक चालक महामार्गावर गेली २ दिवस अडकून पडले होते. त्यांना ना जेवण चहापाणी मिळाला होता. ही बातमी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उपासना केंद्र कराडच्या कार्यकर्त्यांना ६ वाजता मिळाली. लगेच जाऊन पाहणी करून त्यांना लागणारे जेवणाची संदर्भात माहिती केंद्रातील महिला श्रद्धावानांना देण्यात आली. त्यांनी ती लगेच बनवायला घेतली. जवळपास ४०० पाकिटे १ तासात तयार केली. त्याठिकाणी केंद्रातील तरुण श्रद्धावान कार्यकर्त्यांनी वाटली. सदर माहिती समाजमाध्यमांवर देताच इतर लोकांनीही पाणी, बिस्किटे, भात, आमटी आपापल्यापरीने घेऊन आले आणि सर्व चालकांना जेवायला घातले. कराड, गोळेश्वर, वारुंजी, बनवाडी केंद्रांनी सहभाग घेतला. सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्राच्या सेवेची दखल घेत पोलिसांनी कौतुक केले.












