कै. दिनकर सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील निराधार महिलेला आर्थिक सहाय्य

सावंतवाडी:- कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीमती कामत यांच्या घराची बरीच पडझड होऊन दुरावस्था झाली होती.