पूरग्रस्त चिपळूणवासियांना तळवडे आंबेकर-भितळेवाडी विकास मंडळाचा मदतीचा हात

लांजा – तालुक्यातील तळवडे येथील मौजे तळवडे आंबेकर – भितळेवाडी विकास मंडळाच्या काही होतकरू युवकांच्या मार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्यात आला. विशेषतः कळंबस्ते, काविळतळी व खेर्डी येथील लोकांना ही मदत देण्याचा प्रयत्न केला गेला.

पाच किलो तांदूळ, अर्धा किलो डाळ, एक किलो साखर, चहा पावडर,बिस्किटे, वेफर्स, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, गोडेतेल, गरम मसाला, कांदे, बटाटा, कडधान्य, शेंगदाणे, मीठ, चपातीचे पीठ या सर्वांचे एक किट बनवण्यात आलं आणि अशाप्रकारे १०० किटचे वाटप या पूरग्रस्तांना करण्यात आले. यासोबत प्रत्येकी एक चादर व एक टॉवेलही देण्यात आला.

ही सर्व मदत मौजे तळवडे आंबेकर – भितळेवाडी विकास मंडळाच्या काही युवकांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यातून उभी केली. यामध्ये काही दानशूर व्यक्तींनीही मोठे सहकार्य केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राकेश आंबेकर, श्री. मोहन आंबेकर, श्री. कृष्णा भितळे, श्री. अमोल भितळे, श्री. वसंत भितळे, श्री. संदीप भितळे, श्री. उदय आंबेकर, कु. प्रतिक भितळे, श्री. रवींद्र भितळे, श्री. प्रशांत आंबेकर, श्री. आत्माराम वि.आंबेकर, श्री. विनोद भितळे, श्री. सुदर्शन आंबेकर, श्री. सुरेश पितळे, श्री. अनंत य. आंबेकर, श्री. सुजित आंबेकर यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली.