अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिचा द्वितीय क्रमांक
मुंबई:- यशवंत नगर, विरार आयोजित अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिला द्वितीय क्रमांक तर सांताक्रूझ येथे साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धाकांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला असून तिचे सर्व थरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वरळी येथील शारदा कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे मालक श्री. गणेश परब यांची कु. गिरीजा ही भाची होय. कु. गिरीजाच्या यशाने परब कुटुंबियांना – नातेवाईकांना आनंद झाला असून सर्वांनी कु. गिरीजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभुदय नगर, काळाचौकी, मुंबई येथे राहणारी बारा वर्षीय चिमुरडी कु. गिरीजा हिने यापूर्वी मल्लखांब स्पर्धेतही दैदिप्यमान यश संपादन केले आहे. मेहनत, जिद्द आणि खेळाची आवड ह्यातून कु. गिरीजाने आजपर्यंत केलेली यशस्वी वाटचाल अभिमानास्पद आहे. तिच्या आई वडिलांनी तिला वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन महत्वाचे ठरले. त्याचप्रमाणे ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमीचे ऋतुराज शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वायएमसीए, मुंबई सेंट्रल येथे कु. गिरीजा सराव करते.