चांद्रयान-२ अवकाशात प्रेक्षपण करून भारताची अभिमानास्पद कामगिरी!
श्रीहरिकोटा:- आज चांद्रयान-२ अवकाशात प्रेक्षपण करून भारताने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदीसह सर्व मान्यवरांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले असून अवघ्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहातून अभिनंदन करण्यात आले.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणतात की, श्रीहरिकोटा से चन्द्रयान-2 का ऐतिहासिक प्रक्षेपण हर भारतीय के लिए एक गर्व का क्षण है। भारत के स्वदेशी अंतरिक्ष कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए इस्रो के सभी वैज्ञानिकों और इंजीनियरों को बधाई। मेरी कामना है कि टेक्नॉलॉजी के नए-नए क्षेत्रों में ‘इसरो’, नित नई ऊंचाइयों तक पहुंचे। चंद्रयान-2 अब से लगभग 50 दिनों में चंद्रमा के दक्षिणी ध्रुव के करीब उतरने वाला पहला अंतरिक्ष-यान होगा। आशा है यह मिशन नई खोजों को जन्म देगा और हमारी ज्ञान प्रणालियों को समृद्ध करेगा। मैं चंद्रयान-2 टीम की सफलता की कामना करता हूँ.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, भारत के लिए यह एक ऐतिहासिक क्षण है। चंद्रयान-2 के सफल प्रक्षेपण से आज पूरा देश गौरवान्वित है। मैंने थोड़ी देर पहले ही इसके लॉन्च में निरंतर तन-मन से जुटे रहे वैज्ञानिकों से बात की और उन्हें पूरे देश की ओर से बधाई दी।
भारताचं चांद्रयान-२ मोहिमेची वैशिष्ठये
१) चांद्रयान-१ मोहीम यशस्वी करून इस्रोने भारताला मान मिळवून दिला. भारतही भविष्यात ह्या क्षेत्रात क्रांती करणार असल्याचे स्पष्ट केले.
२) चांद्रयान-२ मोहिमेची सुरुवात आजपासून झाली आहे.
३) चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट आहे. आजपर्यंत चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आजवरची चांद्रयानं उतरली आहेत. भारताचं चांद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र दऱ्याखोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे.त्यामुळे इथे यान उतरवण्याचे धाडस आजपर्यंत कोणत्याही देशाने केले नाही; ते इस्रो करणार आहे.
४) चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून त्यातून एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठावर सोडणार आहे.
५) चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
६) चांद्रयाना-२ चे तीन भाग असतील. ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हर.
७) लँडरचं नाव ‘विक्रम’ असं ठेवण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक मानले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे. रोव्हरचं नाव ‘प्रग्यान’ असं ठेवण्यात आलं आहे. हे सर्व भाग इस्रोने तयार केले आहेत. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील.