आमदार नितेश राणे यांचा स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद
सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून इस्रो करिता तीन दिवसांच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद आमदार नितेश राणे यांनी संवाद साधत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत, उपाध्यक्ष श्री.रणजित देसाई, सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.