सार्वजनिक क्षेत्रातील ९ मोठ्या बँका बंद होणार नाहीत! आरबीआयचे स्पष्टीकरण

नवीदिल्ली:- कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक बंद होणार आहेत; अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आरबीआयने ह्या वृत्ताला अफवा ठरवली आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयने कडक कारवाई केली आणि सहा महिन्यासाठी बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली. त्यामुळे कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक बंद होणार आहेत ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अहवालांच्या दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज म्हटले आहे की, देशात एकही बँक बंद होणार नाही. बँक बंद झाल्याच्या बातम्या पूर्णपणे अफवा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक ऑफ महाराष्ट्रवर कडक कारवाई केली आणि ६ महिन्यासाठी बँकेच्या व्यवहारावर बंदी घातली आहे.

You cannot copy content of this page