फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानिय जितेंद्र लोके यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

जितेंद्र लोके फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असतात. त्याचबरोबर जागतिक किर्तीच्या टाटा रुग्णालयात त्यांनी गेली ३० वर्षे सेवाभावी वृत्तीने अखंड सेवा केली. त्यासाठी त्यांचा यथोचित सत्कार टाटा रुग्णालय व्यवस्थापनाने ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे अकॅडमी डायरेक्टर डॉ. श्रीपाद बनावली, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. सी. एस. प्रमेश, मुख्य व्यवस्थापक अधिकारी श्री. अनिल साठे यांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. ह्यानिमित्ताने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई ह्या संस्थेने सुद्धा जितेंद्र लोके यांचा यथोचित सत्कार केला. फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांनी केलेल्या सेवा कार्याची दखल अनेक नामवंत संस्थांनी यापूर्वीही घेतली आहे.

You cannot copy content of this page