सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान

सावंतवाडी:- येथील कै डाॅ भाऊसाहेब परूळेकर हाॅस्पिटल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व विविध आजाराने त्रस्त अशा दहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश मुंबई येथील सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार पुष्पसेन सावंत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी ईर्शाद शेख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर व जिल्हा काँग्रेस पदाधिकारी आनंद परूळेकर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या तसेच ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सदर धनादेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी सिंधुरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी व जिल्हा प्रवक्ते डाॅ जयेंद्र परूळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच सामंत ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली.

लाभार्थी गरजू रुग्णांमध्ये सातार्डा येथील लिलावती जाधव, यशोदा सातार्डेकर, आरोंदा येथील गोपाळ दड्डीकर व प्रभावती तानावडे, रेडी येथील चंद्रलिला रेडकर, इन्शुली येथील अरविंद जाधव, मातोंड येथील शांताराम खाजणेकर, कारिवडे येथील लक्ष्मी काळसेकर, कोलगाव येथील लक्ष्मी दळवी व कुडाळ येथील शिला भिसे यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी डाॅ जयेंद्र परूळेकर व सामंत ट्रस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page