मधू वालावलकर समाजसेवक पुरस्काराने जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित सन्मानित होणार

कणकवली:- `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’च्या वतीने देण्यात येणारा मधू वालावलकर समाजसेवक पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित यांना रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’चे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर हे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक श्री. प्रविण बांदेकर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जेष्ठ साहित्यिक श्री. प्रविण बांदेकर यांच्या साहित्यिककृतीचे अभिवाचन सत्कारमूर्ती वामन (उदय) पंडित करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’चे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर आणि कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page