बेनी बुद्रुक येथे पेजे महाविद्यालयामार्फत रस्ता दुरुस्ती आणि वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील माळवाडी ते मळेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. सदर कामाचे उदघाटन सकाळी शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय नंदकुमारजी मोहिते यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी ग्रामपंचायत बेनी बुद्रुकचे सरपंच संतोष धामणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललितराव खानविलकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत खानविलकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीनाथराव खानविलकर , मधुकर खानविलकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक गुरव, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती सानिका मिंडे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नितेश केळकर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कल्पना मेस्त्री मॅडम, एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

हा उपक्रम ग्रामपंचायत बेनी बुद्रुकच्या विशेष सहकार्याने व बेनी बुद्रुकचे सरपंच संतोषजी धामणे यांच्या विशेष प्रयत्नाने पार पडले. या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री ललीतराव खानविलकर, श्री संजय तथा बाबुराव खानविलकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीकांत खानविलकर, श्री सतीश खानविलकर, श्री प्रज्योत खानविलकर, श्री वसंत खानविलकर, श्रीमती भाग्यश्री खानविलकर, माजी सरपंच श्रीमती नेहा केळकर, श्री सुनील धामणे, श्री मधुकर वारीशे, श्रीमती स्मिता लवंदे या सर्व मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.

रस्ता दुरुस्तीच्या कामाबरोबरच बेनी माळ येथे लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि बेनी बुद्रुक च्या तिन्ही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे विशेष वनभोजन पार पडले. यावेळी हरचे केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख तथा जि प पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळा बेनी बुद्रुक नंबर १ चे प्रभारी मुख्याध्यापक डॉ जनार्दन मोहिते सर, उपशिक्षक तोडणकर सर, त्याचबरोबर जि प प्राथमिक मराठी शाळा, चिंचवाडीचे प्रभारी मुख्याध्यापक तथा उपशिक्षक सोळंकी सर, उपशिक्षिका तांबारे मॅडम, जि प प्राथमिक शाळा क्र. ४ चे प्रभारी मुख्याध्यापक तथा उपशिक्षक अशोक बांगर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. यासर्वांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसह या विशेष उपक्रमात महत्वपूर्ण सहभाग घेतला.

You cannot copy content of this page