ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्रीमती जयश्री परब सन्मानित

कणकवली- महिला दिनानिमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली – परबवाडी येथील आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य निःस्वार्थीपणे अनेक वर्षे करणाऱ्या श्रीमती जयश्री परब यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

श्रीमती जयश्री परब यांनी परंपरागत औषधांच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार करून लोकोपकारी कार्य केले. अनेक बालकांना, महिलांना अचानक उद्भवणाऱ्या आणि गंभीर आजारातून बरे केले. आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य त्या निःस्वार्थीपणे करीत आहेत. या अमूल्य कामगिरीकरिता त्यांना ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष. संतोष नाईक, जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर, कणकवली तालुका अध्यक्ष हनिफ भाई पीरखान, उपाध्यक्ष नितीन बांदेकर, सचिव मनोज वारे, जनसंपर्क अधिकार प्रविण गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख श्रेयश कदम, सदस्य परब, भरत तळवडेकर व परब वाडीतील ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page