जिल्हा माहिती कार्यालयातून प्राप्त सिंधुदुर्ग वृत्त

अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर खबबदारीचे आवाहन- पर्यटनस्थळी सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात 27 जुलै 2023 पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसात अनेकजण वर्षा पर्यटनासाठी धबधब्यात जातात. घारपी, ता. सावंतवाडी येथे असेच 40 ते 50 लोक धबधब्यावर गेलेले होते. त्यावेळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अशा पर्जन्यवृष्टीमुळे धबधब्यातील पाणी वाढले आणि या लोकांना सदर ठिकाणाहून परत येणे अशक्य बनले. अशावेळी पोलीसांच्या टीमने सदर ठिकाणी जावून त्या पर्यटकांचे प्राण वाचवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

ज्या वेळी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामन विभागामार्फत देण्यात आलेली असेल त्यावेळी नागरिकांनी धबधब्याच्या एकदम आत प्रवेश करु नये किंवा सेल्फी काढू नये. पाणी किंवा पाऊस वाढत असल्याची कल्पना येताच त्वरित सदर ठिकाणावरुन माघारी परतावे. काही आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (02362) 228847 आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02362 228614 या क्रमांकावर संपर्क साधावा.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 228847 किंवा टोल फ्री 1077 ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी 02363 256518 सावंतवाडी तालुक्यासाठी 02363 272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी 02366 262053, कुडाळ तालुक्यासाठी 02362 222525, मालवण तालुक्यासाठी 02365 252045, कणकवली तालुक्यासाठी 02367 232025, देवगड तालुक्यासाठी 02364 262204, वैभवाडी तालुक्यासाठी 02367 237239 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी. किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 228847 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.

जिल्ह्यातील अनुदानित क्रीडा प्रकाराच्या एकविध खेळ संघटनांची बैठक

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यास्तरीय अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष, सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित केली, असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविलेले आहे.

या बैठकीस उपस्थित राहतांना जिल्हास्तर एकविध क्रीडा संघटना नोंदणी प्रमाणपत्र. जिल्हास्तर संघटना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे पत्र सोबत आणावे.

पुढीलप्रमाणे खेळ प्रकारातील संबंधित खेळाच्या संघटनानी याची नोंद घ्यावी.

आर्चरी, ॲथलॅटिक्स, बॅडमिंटन, बॉलबॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कॅरम, बुध्दीबळ, आटयापाटया, क्रीकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिमनॅस्टीक, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, वॉटरपोलो, कबड्डी, खो-खो, लॉनटेनिस, मल्लखांब, नेटबॉल, रायफल शुटींग, रोलबॉल, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, शुटींगबॉल, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्कॅश, जलतरण डायव्हिंग, सेपक टकरा, सॉफ्टटेनिस, टेनिक्वॉईट, मॉडर्न पेंटॅथलॉन, रग्बी, वेटलिफ्टींग, कुस्ती, वुशु, योगासन, सुब्रतो फुटबॉल, नेहरु हॉकी.

भात आणि नाचणी पिकविमा काढण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2023 या वर्षासाठी एक रुपयामध्ये भात व नाचणी पिकाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपव्दारे 31 जुलै पर्यंत पिकाची नोंद करावी,असे आवाहन दोडामार्ग तालुक्याचे कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी केले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील चारही महसूल मंडळ मधील भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. भात पिकासाठी संरक्षित रक्कम म्हणून 51,760 प्रति हेक्टर आहे. तर नाचणी पिकासाठी 20,000 प्रति हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरुन बँक, प्राथमिक कृषि पतपुरवठा सह संस्था, आपले सरकार सेवा केंद्र यांच्यावतीने पिक पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. युनायटेड इंडिया जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. पुणे या कंपनीची विमा कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचा टोल फ्री क्रमांक 1800 233 7414 आहे. पिकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड व बॅकपासबुकाची प्रत आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन, भात व नाचणीचे 100 टक्के क्षेत्र पिक संरक्षित करुन जोखीम कमी करावी.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी:- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 26 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 25 जुलै 2023 रात्री 8.55 वा. मनोहर (मोपा) विमानतळ, गोवा येथे आगमन केसरी, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.रात्री 10.30 वा. केसरी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

बुधवार दिनांक 26 जुलै 2023 सकाळी 7 वाजता केसरी, ता. सावंतवाडी येथून ओरोस सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आगमन व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा आढावा व उपाययोजना संदर्भात बैठक. स्थळ :- जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जि.सिंधुदुर्गनगरी, सकाळी 10 वाजता ओरोस येथून मनोहर विमानतळ (मोपा) गोवा कडे प्रयाण.

You cannot copy content of this page