विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण!
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन! कौतुकाचा वर्षाव!!
मुंबई:- मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षणमंत्री कार्यालयातील कर्मचारी विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसीपणामुळे महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्री यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी श्री.डुबल आणि श्री.मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ या महिलेस उडी मारण्यापासून रोखल्याने अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सहकाऱ्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये कौतुक होत आहे.
विजयसिंह डुबल आणि सागर मिरगळ यांचे पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून अनिरुद्ध अभिनंदन! परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र जोगेश्वरी पश्चिम परिवाराचे विजयसिंह डुबल सदस्य आहेत. त्यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना सर्वांनी खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा दिल्या.