ज्येष्ठ समाजसेवक अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत सन्मानिय अनिल तांबे (असलदेकर) स्वतःच्या षष्ठब्दीपूर्ती सत्कारास आपले ज्वलंत मनोगत व्यक्त करताना! सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ठब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे विशेष सत्कार दादर- माटुंगा कल्चरल सेंटर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी अनिल तांबे यांचे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन करून गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

मान. अनिल तांबे (ज्येष्ठ समाजसेवक) षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन आणि गौरव विशेषांक प्रकाशन सोहळा ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप कदम (भूतपूर्व डिस्ट्रिक्ट गर्व्हनर ३१४२ रोटरी इंटरनॅशनल) आणि स्वागताध्यक्ष परशुराम नादकर – (कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई) होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी प्रिं. आर. एल. तांबे – (तांबे एज्युकेशन सोसायटी), सिद्धार्थ मोरे (निवृत्त प्रादेशिक संचालक- श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार), शांताराम गायकवाड (निवृत्त वरिष्ठ अधिकारी एम. बी. पी. टी. रेल्वे विभाग), उद्योजक सुरेश डामरे आदी अनेक नामवंत उपस्थित होते.

अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती सत्कार समिती, मुंबईचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, कार्याध्यक्ष दत्ता पवार, सरचिटणीस प्रदीप सर्पे, खजिनदार सुनिल तांबे, प्रकाशन समिती लक्ष्मण चौकेकर यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम दिमाखात संपन्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी अतिशय सुंदर-प्रभावीपणे केले.

You cannot copy content of this page