श्रद्धावानाला त्रास देणाऱ्यास `तो’ नक्कीच सजा करतो!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सातवा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास।

सजा मी नक्कीच देईन त्यास॥

 

अर्थ नीट कळण्यासाठी या वचनातील तीन शब्द जास्त महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. एक म्हणजे भक्त, दुसरा शब्द त्रास आणि तिसरा शब्द सजा.

वरील वचन आमच्या आयुष्यात अनुभवता यावे यासाठी मी भक्त आहे का असा विचार आधी स्वतः करायला हवा. भक्तीचा यथाशक्ती प्रयास करणे, सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे आणि सद्गुरूंनी जे दिले आहे त्याचा प्रेमाने स्वीकार करणे – याने माझी भक्तीच्या पायवाटेवरची वाटचाल निर्धोकपणे होऊ लागते.

दुसरा शब्द आहे त्रास. प्रत्येकाला वाटत असते की मी बरोबर आहे आणि इतर जण मला त्रास देत आहेत. मी नीट काम करत नसलो आणि बॉस मला ओरडला की त्याला त्रास म्हणायचे का ? कामधंदा न करता एखादा घरी बसतो. त्याला आई वडील बायको काम न करण्याविषयी बोलतात. त्याला त्रास म्हणायचे का? आत्ताच्या काळात आमच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्याने गैरसोय होते. पण त्याला त्रास म्हणायचे का? या सर्व गोष्टींव्यतिरिक्त मानवांतील काही असुरी प्रवृत्ती इतरांच्या काया वाचा मनाला त्रास होईल असेच वागत असतात. तो त्रास होय. बापूंनी प्रवचनात सांगितले होते की देव फक्त असुरांना सजा करतो मानवांना नाही.

“जेव्हा आम्ही चुकतो आणि काही शिक्षाही होत नाही, तेव्हा आम्हाला वाटतं देवाला काही कळतं नाही. पण जेव्हा कळ लागते तेव्हा कळत देवाला सगळं दिसतं. स्वत:ला कळ लागल्याशिवाय देवाला सगळं कळतं हे कळत नाही. कळ, दु:ख, वेदना हे भगवंत देत नसतो. तो फक्त असुरांना सजा देतो, मानवांना नाही.” ( २७ डिसेंबर २०१२)

सध्याच्या काळात मानवदानवांतील अभेदामुळे असुरी प्रवृत्तींना ओळखणे अवघड आहे. आपण आपल्याला होणारा त्रास होऊ नये, ही प्रार्थना त्याला करायची. पुढे सजा द्यायची की काय करायचे हा त्याचा प्रांत !!!

एक छान विचारही करून पाहायला पाहिजे. शंभर शत्रू एकत्र येऊन मानवाचे जेवढे नुकसान करू शकतात त्याहून जास्त नुकसान त्याचे स्वतःचे मन करू शकते. बहुसंख्य त्रास हे मनाच्या विषयांकडे असणाऱ्या ओढीमुळे, त्यासाठी प्रयत्न करायला इंद्रियांना जुंपल्यामुळे होत असतात. मग या आमच्या मनालाही सजा देणार का? नक्कीच. सजा हा शिक्षा या अर्थी फारसीतून आलेला शब्द आहे. `शिक्षा’चा एक अर्थ शिकविणे संबंधित आहे. मनाला सजा हा अनिरुद्धशिव देतोच. ही सजा म्हणजे मनाचे रूपांतर…

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपण “त्या” शिव-शंकराला अत्यंत प्रेमाने प्रार्थना करू या की ” हे महादेवा , माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण. मला संपूर्ण विश्वास आहे की त्याने माझे भलेच होणार आहे.” ( -परमपूज्य बापू)

मनः चे रूपांतर नमः मध्ये हा त्रिविक्रम करुन घेतोच; तेही नामाचे साधन वापरून.

अनिरुद्ध हरि मंत्र षडक्षरी
वाचे जो उच्चारी तो तरला

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

(क्रमशः)
-डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक आठवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *