आजचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार, दिनांक २ एप्रिल २०२१
शुक्रवार, दिनांक २ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – १२
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष पंचमी ०८ वा. १५ मि. पर्यंत, षष्ठी २९ वा. ५८ मि. पर्यंत
नक्षत्र- ज्येष्ठा २७ वा. ४३ मि. पर्यंत,
योग- व्यतिपात २३ वा. ३९ मि. पर्यंत,
करण १– तैतिल ०८ वा. १५ मि. पर्यंत, वणिज २९ वा. ५८ मि. पर्यंत,
करण २- गरज १९ वा. ०३ मि. पर्यंत
राशी- वृश्चिक २७ वा. ४३ मि. पर्यंत,
सूर्योदय- ०६ वाजून ३४ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५१ मिनिटे
भरती- ०२ वाजून ३५ मिनिटे, ओहोटी- ०८ वाजून ५२ मिनिटे
भरती- १५ वाजून ३२ मिनिटे, ओहोटी- २१ वाजून ३२ मिनिटे
दिनविशेष –
रंगपंचमी, श्री एकनाथ षष्ठी, गुडफ्रायडे
जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
१९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला.
२०११ – अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा ध्वज भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
जन्म:-
१८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्यायहरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
१९०२:बडे गुलाम अली खॉं ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत.
१९६९:अजय देवगण – अभिनेता