`भारतीय वैदिक विज्ञान संशोधन, संस्था मुंबई’ संस्थेच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई:- `भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई’ या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा मुक्त कविता लेखन स्पर्धेचे (मार्च २०२१ मध्ये) नुकतेच आयोजन केले होते. ऑनलाइन स्वरुपात झालेल्या या काव्य स्पर्धेत ६० पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला होता. कमीत कमी शब्दात आशयघन व प्रेरणादायी शब्दरचना याशिवाय लेखनातील रचनावृत्त शब्दलयता इत्यादी अन्य निकष यासाठी निश्चित केले होते.

या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. सुनंदा शिवाजी माने ( पुणे), द्वितीय क्रमांक विभागून श्री. धनंजय देशमुख व सौ. शितल उमेश कुलकर्णी (पनवेल) यांना तर तृतीय क्रमांक विभागून श्री. तुषार शा. वि.सुत्रावे ( उस्मानाबाद) व सौ. कल्पना वि. दुर्गुडे (अहमदनगर) या कवींना मिळाला आहे.

याशिवाय विशेष उत्तेजनार्थ उल्लेखनीय कविता कवी सौ. कविता आमोनकर ( मडगाव-गोवा ), सौ. सुलभा दि. लोहकरे ( मुंबई), सुचेता सावंत (दादर मुंबई), श्री. पद्मनाभ प्र.भागवत (नवीन पनवेल), कवी श्री. पद्माकर शिरसाट (भांडुप मुंबई) यांना प्राप्त झाला आहे. सहभागी इतर सर्व कविवर्यांना संस्था परिवारातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंदसर व संस्था संबंधित मराठी भाषा व समीक्षण क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवरांचे यामध्ये विशेष मार्गदर्शनपर योगदान लाभले. विजेत्या कवींना तसेच इतर कविंना सहभाग इप्रमाणपत्र ऑनलाइन स्वरुपात ७ एप्रिल पूर्वी पाठवण्यात येईल. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेमार्फत सर्व विजेत्या कवींचे अभिनंदन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page