उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १ नोव्हेंबर २०२१

राष्ट्रीय मिती कार्तिक – १०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष एकादशी दुपारी १३ वाजून २१ मिनिटापर्यंत
नक्षत्र- पुर्वा फाल्गुनी दुपारी १२ वाजून ५२ मिनिटापर्यंत
योग- ऐंद्र रात्री २१ वाजून ०३ मिनिटापर्यंत

करण १- बालव दुपारी १३ वाजून २१ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव २ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजून ३१ मिनिटंपर्यंत

चंद्रराशी- सिंह सायंकाळी १८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४१ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०३ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २ वाजून ५३ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १५ वाजून ४८ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून ०२ मिनिटांनी आणि सायंकाळी २१ वाजून ४० मिनिटांनी
ओहोटी- रात्री ०२ वाजून ३६ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून २७ मिनिटांनी

आध्यात्मिक दिनविशेष:- आज आहे रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसूबारस

गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा.

आज जागतिक वनस्पतीभक्षक दिन

ऐतिहासिक दिनविशेष:-
१६८३ साली छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

१८४५ साली मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज ह्या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

१९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा मानाचा कबीर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

You cannot copy content of this page